Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मंत्रिमडंळ विस्तारानंतर शिवसेनेत वादाची ठिणगी.! ; आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद हुकल्यामुळे शिवसेना उपनेतेपदाचा दिला राजीनामा.

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली, यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. भाजपच्या 19 मंत्र्यांनी रविवारी शपथ घेतली, तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळू शकलेली नाही. मंत्रिपद हुकल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. याचा पहिला धक्का हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे.

पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र त्यांंचं मंत्रिपद हुकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत शिववसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी मंत्रिमंडळात आपण पाहिलं तर अशा लोकांना मंत्रिपद मिळाले ज्यांचं पक्षात काहीच योगदान नाही, अनेक आक्षेप व भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा लोकांनाही मंत्रिपद मिळालं. असे असताना आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे त्याचं दुःख वाटतं. माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी पूर्व विदर्भ समन्वयक व उपनेता असून जर मी जनतेला न्याय देऊ शकत नसेल तर मी कशाला पदावर राहू, असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. मात्र, यंदा मला मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात देऊनही डावलले गेले. शिंदेंच्या शिवसेनेत गेल्याचा मला पश्चाताप होत आहे. वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा देईल, असा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles