Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळेत सनातन ग्रंथाचे वितरण.

देवगड :  देवगड तालुक्यातील तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित ‘महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार’ आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेबाजार या शाळेत सनातन संस्था प्रकाशित ग्रंथांचे वितरण करण्यात आले. तळेबाजार हायस्कूलमध्ये सनातन संस्थेचे येथील संदीप तळवडेकर आणि माजी मुख्याध्यापक नारायण हिंदळेकर यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘अभ्यास कसा करावा ?’, ‘टी.व्ही, भ्रमणभाष आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा’, ‘राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्हा !’, ‘गुण जोपासा आणि दोष घालवा !’ आदी ग्रंथ भेट देण्यात आले.
याविषयी अभिप्राय देतांना शाळेचे मुख्याध्यापक रघुंनंदन घोगळे म्हणाले, ‘‘ही अतिशय उपयुक्त अशी पुस्तके आहेत. याला लाभ विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक यांनाही होणार आहे. अशा पुस्तकांमुळे विद्यार्थी अभ्यासाकडे वळतील. त्यांच्यातील वाचन प्रेरणा विकसित होईल. पुस्तक वाचल्यावर लक्षात आले की, या पुस्तकातून चौफेर ज्ञान विद्यार्थ्यांना मिळेल.’’
तळेबाजार हायस्कूलच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून हे ग्रंथ विद्यार्थ्यांना दिले जाऊन ते वाचल्यावर त्यांच्याकडून परत घेतले जातात आणि त्यानंतर पुन्हा दुसर्‍या मुलाला दिले जातात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे ग्रंथ पोचणार आहेत.
श्री. तळवडेकर पुढे म्हणाले, ‘‘या पुस्तकांमुळे बालमनावर चांगले संस्कार होतील. शालेय जिवनात ही पुस्तके चांगली मार्गदर्शक ठरतील, तसेच एकूणच जीवनातही पुस्तके जीवनाला चांगली दीशादर्शक ठरतील हे नक्की आहे.’’
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेबाजार या प्रशालेतील ९० विद्यार्थ्यांना सनातन संस्था प्रकाशित रामरक्षा स्तोत्र आणि मारुतिस्तोत्र हे ग्रंथ वितरीत करण्यात आले. या वेळी प्रारंभी दोन्ही स्तोत्रांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. मुख्याध्यापक श्री. समीर राजाराम कुडाळकर यांनी, ‘शनिवारी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी या’, असे सनातनच्या साधकांना सांगितले. या वेळी सौ. स्नेहा समीर कुडाळकर आणि सौ. सुष्मिता संदीप मिराशी या शिक्षिका उपस्थित होत्या.
याविषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री. समीर राजाराम कुडाळकर म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या वतीने आणि श्री. योगेश पारकर यांच्या सौजन्याने आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना श्रीरामरक्षा स्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र (अर्थासह) या ग्रंथांचे वितरण करण्यात आले. सनातन संस्थेचा हा स्तूत्य उपक्रम आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन आणि पाठांतर करण्याची आणि अध्यात्माची गोडी वाढेल. आपल्या संस्कृतीचे बीजही मुलांमध्ये रूजेल. अशा ग्रंथांमुळे विद्यार्थी भारताचे सुजाण नागरिक बनायला साहाय्य होणार आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles