Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

आधारकार्ड अपडेट करायचं राहिलं?, टेन्शन घेऊ नका. ; UIDAI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय.

नवी दिल्ली : आधारकार्डशिवाय आता भारतात राहणं कठीण आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आधारकार्ड हे आता महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. प्रत्येक सरकारी कामात या कागदपत्राची आवश्यकता भासते. त्यामुळे याकडे कानाडोळा करून चालणार नाही. आधारकार्ड प्रत्येक भारतीयांचं ओळखपत्र आहे. युआयडीएआयने आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची तारीख ठरवली होती. पण ही डेडलाईन उलटून गेल्याने अनेकांच्या पोटी गोळा आला होता. तुम्हीही आधारकार्डमध्ये डीटेल अपडेट करण्यास विसरला असाल तर टेन्शन घेऊ नका. कारण युआयडीएआयने आधार डीटेल फ्रीमध्ये अपडेट करण्याची डेडलाईन वाढवली आहे. आता हे डेडलाईन 14 जून 2025 पर्यंत असणार आहे. म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी अजून सहा महिन्यांचा अवधी मिळाला आहे. या तारखेनंतर आधार डिटेल अपडेट करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त फी भरावी लागणार आहे. त्यामुळे आधार डिटेल अपडेट करायचे असतील तर सहा महिन्यांच्या आत करा. ही फ्री सेवा myAadhaar पोर्टलवर आहे.

युआयडीएआयने एक्स खात्यावर याबाबत एक पोस्ट केली असून त्याबाबत माहिती दिली आहे. ‘UIDAI ने मोफत ऑनलाइन डॉक्युमेंट अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2025 पर्यंत वाढवली आहे. जेणेकरून लाखो आधार क्रमांक धारकांना फायदा होऊ शकेल. ही मोफत सेवा myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. UIDAI लोकांना त्यांचे आधार डॉक्युमेंट अपडेट ठेवण्यासाठी सतत प्रेरित करत आहे.’

आधार अपडेट प्रक्रिया –
  • सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ वेबसाइटवर लॉग इन करा.
  • आता आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरा आणि नंतर OTP येईल तो टाका.
  • आवश्यक कागदपत्रावर क्लिक करा आणि ते अपलोड करा.
  • अपडेट रिक्वेस्ट फॉर्म भरा.
  • तुमची रिक्वेस्ट सेंड करा. तुम्हाला आधार ट्रॅक करण्यासाठी URN मिळेल. ते सेव्ह करा.
  • बायोमेट्रिक अपडेटसाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. फिंगरप्रिंट स्कॅन, फोटो किंवा आयरिस बदलण्यासाठीही शुल्क भरावे लागेल.
  • ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles