नागपूर : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नावाची घोषणा होताच राजभवन परिसरात एकच जल्लोश करण्यात आला भारत माता की जय!! नितेश राणे आगे बढो!! आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला याकडे सर्वाचे लक्ष वेधले.महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे संपन्न. यावेळी महायुतीचे मंत्री यांचा शपथविधी संपन्न झाला. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करताना मोठया मताधिक्याने विजयी झालेले आमदार नितेश राणे यांनीही मंत्री पदाची शपथ घेताच भाजपा कार्यालयात जल्लोष करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, समीर नलावडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अबिद नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोटया सावंत यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.



