नागपूर : येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देशाचे लोकप्रिय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची धुळे ग्रामीणचे भाजपाचे युवा आमदार राघवेंद्र पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. दरम्यान मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राघवेंद्र पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या.
या भेटीत धुळे तालुक्यातील विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. यासाठी नितीन गडकरी यांचे युवा आमदार राघवेंद्र पाटील यांनी आभार मानलेत. या प्रसंगी कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, सरपंच रावसाहेब गिरासे आदि मान्यवर उपस्थित होते.