Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या तात्काळ सोडवा! : भाजपा शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर.

सावंतवाडी : येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेली हदयरोग तज्ज्ञ आणि तज्ज्ञ यांची मंजूर असलेली प्रत्येकी दोन पदे तात्काळ भरण्यात यावीत. तसेच ऑपरेशन थिएटर आणि सीटीस्कॅन यंत्रणा कायम चालू रहावी, यासाठी जनरेटरची सोय तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी महिला भाजपाच्या माध्यमातून आज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गिरीशकुमार चौगुले यांच्याकडे शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या माध्यमातून करण्यात आली
रुग्णालयात असलेल्या विविध समस्या बाबत मंत्री नितेश राणेंचे लक्ष वेधणार असून रुग्णांना चांगली सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे असे सौ मडगावकर यांनी सांगितले
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी अनेक रुग्ण सेवा घेत आहेत महामार्गावर असल्यामुळे आपत्कानील परिस्थिती या रुग्णालयात अनेक रुग्णांना दाखल केले जाते परंतू त्या ठीकाणी विज नसल्यानंतर अत्यावश्यक प्रसंगात महत्वाची असलेली सिटीस्कॅन मशीन सुरू होत नाही त्यामुळे अनेक रुग्णांना परत कींवा अन्य ठीकाणी पाठवावे लागते लाईट नसल्यामुळे ऑपरेशन थिएटर मध्ये अनेक अडचणी येतात त्यामुळे याकडे तात्काळ लक्ष द्यावा तसेच रिक्त असलेली हदयरोग तज्ञ आणी भुलतज्ञ पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी श्री चौगुले यांच्याकडे केली याबाबत आम्ही वरिष्ट स्तरावर प्रस्ताव पाठविला आहे याबाबत आपल्याला माहीती देवू लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा करा असे चौगुले यांनी सांगितले
यावेळी माजी नगरसेविका दिपाली भालेकर,मेघना साळगावकर,ज्योती मुद्राळे,मेघा भोगटे,सविता टोपले,अन्वीषा मेस्त्री आदी उपस्थित होते

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles