Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवणे काळाची गरज.! : युवराज लखमराजे भोंसले.

सावंतवाडी : सहयोग ग्रामविकास मंडळ माजगाव जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग, श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी व यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर 2024 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये चार आठवड्याचा हेल्पर इलेक्ट्रिकल टेक्निशियन या शासनमान्य व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज
लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे श्री अच्युत सावंत-भोंसले, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एम ए ठाकूर, जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे संचालक श्री सुधीर पालव, सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, प्रा. एम व्ही कुलकर्णी, श्री अण्णा देसाई, बाळू धुरी प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. सुभाष गोवेकर, श्री राजेंद्र बिर्जे, श्री दत्तप्रसाद गोठोस्कर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पावसकर, जनशिक्षण संस्थांनचे श्री गजानन गावडे, श्री गणेश परब, महाविद्यालयाचा प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोग ग्रामविकास मंडळ माजगावचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर यांनी केले.त्यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश विशद केला.मेक इन इंडिया त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे यासाठी येथील तरुणांनी आत्मनिर्भर होऊन कौशल्य विकसित करून भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे अध्यक्ष अच्युत सावंतभोंसले यांनी आपल्या
मनोगतामध्ये
स्किल शिवाय पर्याय नाही, स्किल डेव्हलपमेंट च्या माध्यमातून अनेक संधी आजच्या तरुण पिढीसाठी् उपलब्द आहेत.त्यासाठी आपल्यातील कौशल्य विकसित करणेआवश्यक आहे असे ते म्हणाले.
जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चेे संचालक सुधीर पालव यांनी जनशिक्षण संस्थान हे ग्रामीण भागातील तरुणांसाठी
कौशल्यावर आधारित 30 ते 35 कोर्सेस तसेच दरवर्षाला 1800 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम अनेक वर्ष करत आहेत.त्याचा येथील तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांनी याप्रसंगी सांगितले की स्किल कोर्सेस ही आजच्या काळाची गरज आहे.स्किल साठी खूप रोजगार उपलब्ध आहेत.जॉब चे टार्गेट ठेवून जी गरज आहे ते कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम आपण पूर्ण केल्यास आपणास सहज नोकरी मिळू शकते, त्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. एस. मर्गज यांनी केले तर आभार अण्णा देसाई यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles