मी रामदास आठवलेंची माफी मागतो.! ; चंद्रशेखर बावनकुळेंकडून जाहीर माफीनामा.

पुणे : भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माफी मागितली आहे. “मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडून चुक झाली आहे”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील.  घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे  त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नाही, असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles