मालवण : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच कांदळगाव हायस्कूल येथे संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये शिरवंडे हायस्कूलचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक व्ही. डी. काणेकर यांनी शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य स्पर्धेमध्ये ‘गतीविषयक उपकरणे’ हे साहित्य सादर केले होते. या शैक्षणिक साहित्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. या शैक्षणिक साहित्याची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. यापूर्वी विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री. काणेकर सर यांना १४ वेळा जिल्हास्तरावर व एक वेळ राज्यस्तरावर आपले शैक्षणिक साहित्य प्रदर्शित करण्याचा मान मिळाला होता.
या तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये प्रशालेचा विद्यार्थी कुमार निखिल प्रकाश भावे याने मांडलेली ‘सुलभ फवारणी यंत्र” ही प्रतिकृती सुध्दा उल्लेखनीय होती.
या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी व्ही. डी. काणेकर यांचे अभिनंदन केले असून जिल्हा स्तरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ADVT-



