Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जिल्हा भाजपाकडून नाम. नितेश राणे यांचे जिल्ह्यात भव्य दिव्य स्वागत आणि नागरी सत्कार! ; उपस्थितीचे प्रभाकर सावंत, मनीष दळवींचे आवाहन!

२२ डिसेंबरला स्वागताची जिल्हा भाजपाकडून जय्यत तयारी! 

सिंधुदुर्गनगरी : कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतीय जनता पार्टी परिवार, महायुतीचे सगळे पदाधिकारी,कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिक यांच्यावतीने जिल्ह्यात त्यांचे भव्य दिव्य असं स्वागत करण्याचे नियोजन भारतीय जनता पार्टी कडून करण्यात आलेलंआहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर , जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी माझे सहकारी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली.या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे. आजपर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना राज्यात मंत्रीपद मिळालेलं नव्हतं,ते भाजपा कार्यकर्त्यांचे स्वप्न नितेशजी राणे यांच्या रूपाने पूर्णत्वास आले.त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे.त्यामुळे त्यांच्या स्वागत त्याच पद्धतीचं झालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. २२डिसेंबरला सकाळी सन्माननीय नेते आम नितेश राणे यांचं हे ९.३० वा.खारेपाटण येथे दाखल झाल्यावर त्यांचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत होईल. तिथे उपस्थित मंडळी आणि त्या विभागातील त्या परिसरातले सर्वजण त्यांचे स्वागत करतील त्यानंतर १०.१५ वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे तरळ्यामध्ये थांबतील तिथे स्वागत स्वीकारतील त्यानंतर फणसगांव करून ११.१५ वाजता पडेलला पोहोचतील तिथे त्यांचे स्वागत झाल्यानंतर १२वा. वाजता सन्माननीय मंत्री महोदय देवगडला येतील तिथे त्यांचे जंगी स्वागत होईल १२.४५वा तळेबाजारला स्वागत होईल. दुपारी १.१५ ‍ वाजता शिरगावला स्वागत होईल.दुपारी१.४५ मिनिटांनी नांदगाव करून त्यानंतर दु २.३०वा भारतीय जनता पार्टीच्या वसंतस्मृती ओरोस येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करतील. भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर ३.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये ते भेट देतील जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालकही आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यातील एक संचालक राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्यार्चा आनंद आहे.जिल्हा बँकेमध्ये त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बांद्या कडे रवाना होतील ४.०० वाजता बांदा तदनंतर ४.४५ वाजता दोडामार्ग येथे भव्य दिव्य असं स्वागत होईल आणि आणि मंत्रीमहोदय कणकवली रवाना होतील.सायंकाळी ७ .०० ते ९.०० दरम्यान कणकवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री महोदयांचा नागरी सत्कार संपन्न होईल.भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोरचे पटांगण हे स्थळ आहे त्यानंतर सगळ्यांच्या भेटीसाठी होतील आणि नंतर ते काही इतर कार्यक्रमाना उपस्थित राहतील
दिनांक २२ रोजीच्या दौऱ्यात संपूर्ण जिल्ह्यातील भेटी अशक्य असल्याने पुन्हा दिनांक २५ डिसेंबरला उर्वरित तालुक्यामध्ये जाऊन ते भारतीय जनता पार्टी व नागरी सत्कार स्वीकारतील. सगळेजण आम नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी आमची मंडळी आहेत या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे ज्या त्या ठिकाणी आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे त्याला सुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला माननीय नितेश राणे यांच्या रूपाने हा एक मंत्रीपदाचा बहुमान मिळालेला आहे याआधी जिल्ह्यातील अनेक सुपुत्रांना मंत्रिपदाचा बहुमान मिळाला परंतु विनोदजी तावडे,आशिष शेलार,पालकमंत्री रविंद्राजी चव्हाण ही मंडळी मुंबईचे आमदार म्हणून कार्यरत होते.इतिहासात पहिल्यांदाच या जिल्ह्यातून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत यामुळे खूप मोठ्या उत्साहात त्याचा सत्कार होईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles