सावंतवाडी : तालुक्यातील कलंबिस्त मधील BSNL टॉवर चालू न झाल्यास युवकांचे आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवीकमल सावंत यांनी दिली.
वर्ष उलटूनही टॉवर चालू नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. प्रशासकीय कामकाजस करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. तरी लवकरात लवकर टॉवर चालू न झाल्यास कलंबिस्त मधील युवकांना सोबत घेऊन आंदोलन करू, अशी माहिती कलंबिस्तमधील सामाजिक कार्यकर्ते रविकमल सावंत यांनी दिली.


