Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘जम्मू की धडकन’ प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहची आत्महत्या.!

गुरुग्राम : प्रसिद्ध रेडिओ जॉकी सिमरन सिंहने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. सिमरन सिंह ही गुरुग्राममधील सेक्टर-47 येथील एका सोसायटीत भाड्याने राहत होती. तिच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. आरजे सिमरन ही ‘जम्मू की धडकन’ या नावाने प्रसिद्ध होती. तिच्या मृत्यूनंतर चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

आरजे सिमरन सिंह ( वय 25) ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरही होती. इस्टाग्रामवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 13 डिसेंबर रोजी तिची शेवटची पोस्ट असून त्यामध्ये ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सिमरन सिंहच्या निधनाच्या वृत्तामुळे तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांकडून तिला श्रद्धांजली वाहिली जात आहे. पोलिसांनी सिमरनचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी सिमरन सिंहच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles