Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

ऑनलाईन गांजाची मागणी वाढली .! ; थर्टी फर्स्ट पार्टीसाठी आलेला गांजा ‘नार्कोटिक्स’ कडून जप्त.

मुंबई : भारतात बंदी असलेल्या ‘डार्कनेट’ या वेबसाईटवरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ (ड्रग्स) मागविण्यात येत आहेत. हे ड्रग्स परदेशातून कुरिअर मार्फत भारतातील विविध राज्यामध्ये, शहरामध्ये पोहचवले जातात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) पथकाने मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत १३ किलो हायब्रीड गांजा हे ड्रग्स जप्त केले आहे.

अमली पदार्थांमध्ये हायब्रीड गांजा तसेच हायड्रोपोनिक गांजाला तरुणांनामध्ये मोठी क्रेज असल्यामुळे या ड्रग्सला मुंबई तसेच इत्यादी शहरामध्ये मोठी मागणी आहे. एनसीबीने जप्त केलेला हायब्रीड गांजा हा थायलंड येथून मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली आहे.

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनची जोरदार तयारी असून शहरात विविध ठिकाणी होणाऱ्या पार्ट्यावर मुंबई पोलिसांची करडी नजर असून मागील एका आठवड्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील विविध भागातून ४ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून ११ जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यासाठी आयोजकाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे, पार्टीमध्ये लागणारे विविध प्रकारचे मद्य, तसेच ड्रग्सचा साठा करण्यासाठी मागील एक महिन्यापासून डार्कनेट, तसेच विविध माध्यमातून ड्रग्स मागवले जात आहे.

मुंबई पोलीसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक त्याचबरोबर केंद्रीय तपास यंत्रणानी ड्रग्स विक्रेते, पुरवठादार, ड्रग्स तस्कर, यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील विविध परिसरात तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात हायब्रीड गांजा, मेस्कलिन आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. पहिल्या कारवाईत ९ डिसेंबर रोजी एनसीबीने ४८९ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजासह एकाला अटक करण्यात आली आहे, १७ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर १३ किलो हायब्रीड गांजा जप्त करून एकाला अटक करण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर, थायलंडमधून बेकायदेशीर अंमली पदार्थ मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती, माहितीच्या आधारे थाई एअरवेजच्या फ्लाइट मुंबई विमानतळावर आलेले संशयित पार्सल शोधण्यात आले, या पार्सल मध्ये १३ किलो हायब्रीड गांजा मिळून आला, हे गांजाचे पार्सल मागविणाऱ्याची माहिती मिळवली असता, संबंधित व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याचे तपासात समोर आले. एनसीबीच्या पथकाने तात्काळ कोल्हापूर गाठून तेथून एकाला अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने केलेल्या दुसऱ्या कारवाईत डार्कवेबच्या माध्यमातून मागविण्यात आलेला बेकायदेशीर अमली पदार्थाची माहिती मिळवली असता मुंबईतील पोस्ट कार्यालयात हे पार्सल आले असल्याची माहिती मिळाली, हे पार्सल ताब्यात घेऊन तपासले असता त्यात मेस्कलाइन हे ड्रग्स मिळून आले. हे पार्सल ज्या व्यक्तीला पोहचवले जाणार होते, त्याची माहिती मिळवुन त्यांच्या घराच्या झडतीदरम्यान ४९८ ग्रॅम वजनाची हायड्रोपोनिक गांजाची रोपे सापडली, ही रोपे बेडरूममध्ये नियंत्रित वातावरणात वाढवली जात होती, या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान, व्यक्तीने दुजोरा दिला की जप्त केलेले पार्सल डार्कवेबद्वारे बेकायदेशीर औषधांच्या खरेदीसाठी बुक केले गेले होते. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles