Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

राष्ट्र निर्माणाचा ध्यास घेतलेले शिक्षणक्षेत्रातील दादा म्हणजे राहुल कराड.! : ॲड. नकुल पार्सेकर.

नाशिक : एका युवा संमेलनात स्वामी विवेकानंदानी युवकांना प्रश्र्न विचारला, “तुम्ही शिक्षण कशासाठी घेता? सर्वानी सरसकट एक ठराविक साच्यातील अपेक्षित उत्तर दिलं, अर्थात चांगली नोकरी मिळवून उदरनिर्वाह करण्यासाठी. . . पण स्वामी विवेकानंदाना हे उत्तर अपेक्षित नव्हत. आपल्या स्वतःच्या कल्याणाबरोबरच समाजाचे कल्याण आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला ज्ञानी बनवण्यासाठी करणाऱ्या युवकांच्या शोधात स्वामी होते म्हणूनच ते युवकांचा भारत शोधण्यासाठी भारत भ्रमण करत होते.
आपल्या महाराष्ट्राच्या सुदैवाने आपल्या महाराष्ट्र भूमीत स्वामी विवेकानंदाना अपेक्षित असलेला युवक सापडला जो सातत्याने काही वर्षे खऱ्या अर्थाने विकसित महाराष्ट्राचं  स्वप्न घेऊन काम करत आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेतलेल्या, प्रबळ इच्छाशक्ती, सात्यत आणि चिकाटी याच्या जोरावर यशोशिखरावर पोचलेल्या या व्हिजनरी, कर्तृत्ववान युवकाचं नाव आहे श्री.राहुल कराड, सिर्फ नाम ही काफी है.!

महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षणसंस्था महाराष्ट्र इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (MIT) या शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी दुरद्रुष्टीने १९८३ ला या संस्थेचा मजबूत पाया उभारला आणि यावर कळस चढविला तो राहुल कराड यांनी. जागतिक स्तरावर झपाट्याने सर्वच क्षेत्रांतील बदल आणि आवश्यकता विचारात घेऊन पुणे कोथरूड येथे शेकडो एकर मध्ये उभारलेल्या शैक्षणिक संकुलात एकाच छताखाली यूजी, पिजी, पीएचडी, पी एफ ए, एम्. बी. ए, इंजिनिअरींग अशा एक ना अनेक ट्रेड उपलब्ध करून एम्. आय्. टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून व्हॅल्यू बेस एज्युकेशनचा नवा इतिहास निर्माण केला. हजारो मुला- मुलीसाठी सर्व सोयीनी युक्त हाॅस्टेल, योग्य आहार, शिस्त, सुरक्षा आणि दर्जेदार शिक्षण याचा प्रत्यय या संकुलात येतो. लाखो स्वेअर फुटाच्या आकर्षक इमारती. आधुनिक तंत्रज्ञान वापर करून तयार केलेल्या अद्ययावत वर्गखोल्या, परदेशात शिक्षण घेऊन आलेला प्राध्यापक वर्ग आणि या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर शंभर टक्के रोजगाराची संधी याची योग्य सांगड घालून सुरू असलेलं या एम.आय.टी. चं मार्गक्रमण खरोखरच डोळे दिपावणारं आहे.

राहुल कराड हे एवढ्यावरच थांबले नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या खेड्यांच्या विकासाचा महत्त्वपूर्ण मुद्दा विचारात घेऊन त्यांनी आपल्या समविचारी व सेवाभावी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय सरपंच संसद परिषदेची स्थापना केली. या राष्ट्रीय सरपंच संसद परिषदेच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या विविध भागातील सरपंचाना प्रशिक्षण देवून केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामविकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशिक्षण व प्रबोधनाचे काम सुरू आहे. पोपटराव पवारा सारखे या चळवळीतील आयडाॅल आपल्या गावात कसं नंदनवन फुलवू शकतात त्यांची प्रेरणा घेऊन राष्ट्रीय सरपंच परिषदेने मार्गक्रमण करावं असा त्यांचा आग्रह आहे. मी माझं भाग्य समजतो की माझे मित्र श्री संतोष राणे यांच्या माध्यमातून मा. राहुलजी कराड व सरपंच संसदेचे महाराष्ट्राचे मुख्य समन्वयक श्री योगेशजी पाटील यांच्याशी जोडलो गेलो. चार दिवसापूर्वी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधीत करताना परिषदेच्या पुढील प्रभावी वाटचालीचा अभ्यासपूर्ण आराखडा कार्यकर्त्यांसमोर मांडला.

‘एक है तो सेफ है.!’ ही घोषणा मागच्याच महिन्यात पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत खुप गाजली. ज्याचं प्रतिबिंब आपल्याला निकालातही पहायला मिळाल. अर्थात तो एक निवडणूकीच्या रणनितीचा भाग होता.. पण राहुलजीनी जून २०२३ मध्ये भारतीय संसदीय लोकशाहीला बळकटी देणारा आणि सकारात्मक परिणाम घडवून आणणारा एक ऐतिहासिक प्रयोग मुंबईत केला. देशातील सर्व राज्यातील २५०० आमदारांना या राष्ट्रीय विधायक संमेलनाला निमंत्रित करण्यात आले होते त्यापैकी १८०० आमदारांनी उपस्थिती लावली. अनेक लोकसभेचे माजी सभापती, उपसभापती व विद्यमान सभापती व उपसभापती यानी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. पन्नासहून जास्त आमदारांनी आपली भूमिका मांडली. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी राहुल कराड यांच्या या अभिनव उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. देशात प्रथमच घडवून आणलेल्या या संमेलनात देशाला सातत्याने पुरोगामी विचार आणि नेतृत्व देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत तीन दिवस संपन्न झालेले हे संमेलन म्हणजे भारतीय संसदीय लोकशाही सबळ करण्यासाठी उचललेले यशस्वी पाऊल होत. विविध विचारधारा असणाऱ्या विविध पक्षांच्या आमदारांना एका छताखाली आणून एक है तो सेफ है| चा संदेश देण्याच ऐतिहासिक काम राहुलजीनी केलं. देशाच्या उज्वल भवितव्याचा अखंडपणे अभ्यास आणि संशोधन करण्याचा ध्यास घेऊन सतत कार्यमग्न असलेल्या राहलजींचा सहवास हा माझ्यासाठी मोठा उर्जास्रोत आहे
राष्ट्रीय सरपंच संसदेचे समन्वयक श्री. योगेश पाटील यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात राहुलजींची ग्रेट भेट झाली. संवाद साधला, मला म्हणाले, “तुम्ही पुण्यात या आपण भेटू, काही रचनात्मक विधायक विषयावर चर्चा करू..!” त्यांचे हे निमंत्रण माझ्यासाठी एक नवी उर्जा.

आदरणीय राहुलजी, लगे रहो हम तुम्हारे साथ है.!

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles