सावंतवाडी : गुन्हेगाराला कोणती जात, धर्म, पंथ नसतो. त्यामुळे संतोष देशमुख हत्ती मागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा, अन्यथा सकल मराठा समाज उग्र आंदोलन छडेल.!, असा इशारा सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण पणे हत्या करण्यात आली,अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही या विलोधात आज सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले व समाजाच्या भावना शासन दरबारी पोहचवाव्यात अशी मागणी केली
.यावेळी सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे संदिप एकनाथ गावडे, अशोक दळवी, दिनेश गावडे,प्रा सतीश बागवे यांनी त्रीव भावना व्यक्त करत आरोपिंना त्वरीत अटक करण्यात यावी व फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अशी मागणी केली.
यावेळी अशोक दळवी, सुभाष गावडे ,पंढरीनाथ राऊळ,अभिमन्यू लोंढे ,विश्वास घाग ,समीर परब ,विलास कुडतरकर,जयसिंग सावंत ,सतीश बागवे, भिकाजी धोंड,प्रशांत मोरे ,सुंदर गावडे, दयानंद परब ,केतन कुमार गावडे, मंगेश सावंत, मनोज घाटकर ,चंद्रकांत बिले, लक्ष्मण मोरजकर, प्रमोद सावंत , ॲड चंद्रशेखर गावडे, राजू तावडे, विनायक सावंत, संजय लाड ,नारायण राणे ,आकाश मिसाळ, महादेव राऊळ, संदीप गावडे ,तारकेश सावंत, देवेंद्र सावंत ,नितीन गावडे ,नारायण गावडे ,आबा सावंत, जगदेव गवस ,दीपक गावकर ,प्रवीण गुरव ,गुलाबराव गावडे ,धर्मेंद्र सावंत, रामचंद्र सावंत ,संदीप राणे ,दिगंबर नाईक, दिनेश गावडे, आदि सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
… अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदोलन छेडणार.! : सीताराम गावडे यांचा स्पष्ट इशारा. ; परभणी घटनेवर सकल मराठा समाजाने प्रशासनाचे वेधले लक्ष.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


