सलमान गांगू (मुंबई)
मुंबई / कुडाळ : कुडाळ – मालवणचे फायरब्रँड आम. निलेश राणे यांनी गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या बोट अपघातात तब्बल 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे यांना राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आयुष्य भर मेडिकल ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली.
काही पक्षांनी आरिफ बामणे यांचा वापर फक्त फोटो काढण्यासाठी केला. परंतु आमदार निलेश राणे साहेब यांनी एक कोकणी माणूस या नात्याने आरिफ बामणे यांची मेडिकल ची जबाबदारी स्वीकारली.आणि अंधेरी ऑफिस मध्ये बोलवून स्वागत करून सत्कार केला. यावेळी तिकडे राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुप चे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू, जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख उपस्थित शेख उपस्थित होते
निलेश राणे साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचे चहू बाजूने कौतुक होत आहे.


