सावंतवाडी : विद्यार्थी विज्ञान मंथन ही राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रतिभा शोध ऑनलाइन परीक्षा नवीन भारत डिजिटल उपकरणांसाठी VIBHA, NCERT द्वारे ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
कु.वेदा घनश्याम गावडे हिने इयत्ता 7 वी च्या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला. आणि तिची राज्यस्तरासाठी निवड झाली.तसेच कु. .विराज नंदकिशोर राऊळ याने इयत्ता 9 वी च्या गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला व त्याची राज्यस्तरासाठी निवड झाली.
प्राचार्य रेव्ह.फार.रिचर्ड सालदान्हा यांनी दोन्ही विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन त्यांचे अभिनंदन व सत्कार केला.यावेळी पर्यवेक्षक टिचर.संध्या मुणगेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


