Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी शाळा नं. ६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.!

सावंतवाडी : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळा सावंतवाडी नं. ६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा अतिशय उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

या शुभप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक राजू भालेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख सावंतवाडी), श्रीम.सुमेधा धुरी (अध्यक्षा, इनरव्हील क्लब), श्रीम. दिपाली भालेकर (माजी नगरसेविका) , दिलीप भालेकर(शिक्षणतज्ज्ञ), श्री. पवार सर (मुख्याध्यापक, वि. स. खांडेकर हायस्कूल) ,श्रीम.मुननकर मॅडम ( माजी केंद्रप्रमुख,सावंतवाडी),ॲड.संजू शिरोडकर आदी उपस्थित होते. यावेळी विचारमंचावर श्रीम. खोचरे मॅडम ( अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती) , श्रीम. तुयेकर (उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती) हेही उपस्थित होते.

प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू भालेकर यांच्याहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इनरव्हील क्लबतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यां विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.  यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख मान्यवरांची भाषणे झालीत. अध्यक्षस्थानावरून बोलताना राजू भालेकर यांनी सर्वांना शुभेच्छा देताना शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. तसेच शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर दिलीप भालेकर यांनी सुधीर आडिवरेकर यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला.
नंतर शाळेच्या शिक्षिका श्रीम. सायली लांबर मॅडम आणि श्रीम.मेघा गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध कलाविष्कार* सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
संध्याकाळी रघुकुल स्वरविहार सावंतवाडी प्रस्तुत सुमधुर भावगीतांवर आधारित ‘स्वरसांज’ हा कार्यक्रम माननीय ईश्वरी तेजम मॅडम आणि सहकाऱ्यांनी सादर केला.
सकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तर ‘सांजवेळी दीपोत्सव’ हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पालकवर्गासह शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सुधीर आडिवरेकर ( माजी आरोग्य सभापती, नगरपरिषद सावंतवाडी)यांनी कार्यक्रमासाठी आर्थिक देणगी देऊन  सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा खोचरे मॅडम, उपाध्यक्षा तुयेकर मॅडम, शिक्षण तज्ज्ञ श्री.दिलीप भालेकर ,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा श्रीम. शेख मॅडम,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. तेजम सर,श्रीम.तेजम मॅडम,पालक वर्ग, शिक्षक वर्ग यांनी प्रयत्न केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles