प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. यामध्ये 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर शाही स्नान रद्द करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत.
उ