दोडामार्ग : अंतिम चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेले दोडामार्ग लिजेण्ड्स चषक क्रिकेट स्पर्धेत मनोज पार्सेकर यांच्या वक्रतुंड दोडामार्ग संघाने ओमसाई संघाचा ५ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. शेवटच्या दोन षटकात वक्रतुंड दोडामार्ग संघाच्या गोलंदाजानी टिच्चून गोलंदाजी करीत विजय खेचून आणला. दोडामार्ग तालुक्यातील ४० वर्षांवरील क्रिकेट खेळाडूंसाठी सलग दुसऱ्या वर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुल साटेली – भेडशी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ संघानी सहभाग घेतला होता.साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेले सर्वच सामने चुरशीचे झाले. शेवटच्या दिवशी झालेल्या पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात ओमसाई संघाने मेलीसा वॉरियर्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर वक्रतुंड दोडामार्ग संघाने दुसऱ्या परतीच्या पात्रता फेरीत मेलीसा वॉरियर्स संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.


अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वक्रतुंड दोडामार्ग संघाने विष्णू नाईक २२,संदेश देसाई १२ व योगेश शेट्ये ८ धावा यांच्या जोरावर निर्धारित ५ षटकात ५८ धावा जमवल्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमसाई संघाच्या संदेश रेडकर याने फटकेबाजी केल्याने हा सामना ओमसाई संघ सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र वक्रतुंड दोडामार्ग संघाच्या संदेश देसाई याने गोलंदाजीत कमाल करत संदेश रेडकर याला रोखून धरले.
शेवटच्या षटकात १९ धावांची गरज होती.त्यावेळी संदेश रेडकर याने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला.मात्र शेवटचे षटक टाकणाऱ्या बाप्पा तळणकर याने आपल्या संघाला ५ धावानी विजय मिळवून दिला.ओमसाई संघाच्या संदेश रेडकर याने एकाकी झुंज देत ३९ धावा केल्या.मात्र तो संघाला विजय मिळवून देवू शकला नाही.अष्टपैलू कामगिरी करणारा संदेश देसाई अंतिम सामन्यातील सामनाविराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण,उद्योजक रवींद्र उर्फ बाळू आयरे,गौरीश टोपले,सिंधुदुर्ग हौशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हळदिवे,उपाध्यक्ष अभय नाईक,संघटनेचे पदाधिकारी प्रा.सत्यवान राणे,बाबली वायंगणकर,प्रा.शरद शिरोडकर,राजा राणे,संघमालक मनोज पार्सेकर, राकेश महाजन,मायकल फर्नांडिस,विष्णू गवस,शानी बोर्डेकर,प्रमोद गवस,चांदसाब चांद,चंद्रा आयनोडकर,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मयेकर,संजय धरणे आदींच्या उपस्थित संपन्न झाला.
या स्पर्धेतील मालिकाविराचा किताब वक्रतुंड दोडामार्ग संघाच्या विष्णू नाईक याने पटकवला.उत्कृष्ट फलंदाज म्हणून संदेश रेडकर(ओम साई),उत्कृष्ट गोलंदाज योगेश शेट्ये(वक्रतुंड दोडामार्ग),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बाबू गवस(मेलीसा वॉरियर्स) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.तर यंदाचा दोडामार्ग लिजेण्ड्स चषक देऊन जय भोसले यांना सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेतील विजेता संघ ठरलेल्या वक्रतुंड दोडामार्ग संघाला रवींद्र उर्फ बाळू आयरे पुरस्कृत रोख २५ हजार रुपये व राकेश महाजन पुरस्कृत भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.उपविजेत्या ओमसाई संघाला गौरीश टोपले पुरस्कृत रोख १५ हजार रुपये व सिद्धेश भोसले पुरस्कृत चषक प्रदान करण्यात आला.
मेलीसा वॉरियर्स संघाला संघाला तृतीय क्रमांक तर समाधान क्रिकेट संघाला चतुर्थ क्रमांक मिळाला.या दोन्ही संघाना चांदसाब मजीद चांद पुरस्कृत रोख ५ हजार ५५५ रुपये व संजय डुबळे आणि सिद्धेश कासार पुरस्कृत चषक प्रदान करण्यात आला. सहभागी इतर चार संघाना चेतन चव्हाण पुरस्कृत चषक देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून ५६ वर्षीय सीताराम देसाई यांना गौरविण्यात आले.स्पर्धेसाठी मनोज गोलम,प्रशांत गवस,शैलेश दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेत पंच म्हणून शिवराज परब,पॉलि फर्नांडिस,सागर धरणे यांनी काम पाहिले.गुणलेखन बाबू भणगे यांनी केले. तर समालोचन जय भोसले, अतुल कर्पे, तुषार देसाई, प्रवीण ठाकूर यांनी केले.


