सावंतवाडी : ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गन वादक स्व. पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ठाणे-मुंबई येथील हार्मोनियम व ऑर्गनवादक युवा कलाकार सुशिल गद्रे यांचे सोलो हार्मोनियम वादन आणि कु. निधी जोशी, (आरवली), हिचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. तबला साथ कु. निरज भोसले आणि हार्मोनियम कु. मंगेश मेस्त्री देणार आहेत, उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रकांत घाटे यांनी केले आहे.अ
(अतिशय महत्त्वाची सूचना – सदर कार्यक्रम वेळेवर सुरू होतो, हीच परंपरा कायम टिकवण्यासाठी सर्वांनी कार्यक्रम स्थळी वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती. धन्यवाद.!,)



