कुडाळ : ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस.!’ या उक्तीप्रमाणे दिन-दुबळे आणि वंचित या घटकांसाठी लढणारी संस्था म्हणजे ‘इंटरनॅशनल ह्युमन राइट्स वेल्फेअर असोसिएशन’ होय. या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथील एका अतिशय भयावह अशा वास्तव्यास असलेल्या कातकरी समाज बांधवांच्या वेदना कमी करून त्यांना किमान एका दिवसासाठी तरी चेहऱ्यावर हास्य आणावे या प्रांजळ उद्देशाने आपल्या वाढदिवसानिमित्त ‘हळदी कुंकू समारंभ’ आयोजित करून आपल्या मानवाला मानव मानून माणुसकीचा केंद्रबिंदू मानत आपला वाढदिवस कातकरी भगिनींच्या सानिध्यात राहून त्यांना हळदी-कुंकू समारंभ आयोजित करून आपला वाढदिवस अतिशय आगळे वेगळ्या पद्धतीने साजरा करत समाज मनामध्ये एक वेगळी छाप सोडली आहे.

खरंतर हा केवळ वाढदिवस किंवा हळदी कुंकू समारंभ नव्हता तर होता एक माणुसकीचा आणि माणसात राहून माणसाला माणसासारखे वागवण्याचा प्रयत्न.! यानिमित्ताने मानसी परब यांनी आपल्या वागण्यातून एक आदर्श तर निर्माण केलाच शिवाय अलीकडच्या काळात छोट्याशा सुखाने अतिशय गगनविहार करणाऱ्या व्यक्तींसाठी आदर्श असा संस्कार आणि संदेश बहाल केला आहे, असे वाटते.

दरम्यान यावेळी या कार्यक्रमासाठी यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी, उपाध्यक्ष आनंद कांडरकर, महीला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब, जिल्हा सोशल मीडिया प्रा. प्रमुख रुपेश पाटील, कुडाळ तालुकाध्यक्ष आर. के. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संदीप सुकी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र खानोलकर, कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सौ. दीक्षा सावंत, सदस्य साबाजी परब, सदस्य सौ. सायली रेगे, सदस्य गौतम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


