Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

आज बॅनरवर तुडवले उद्या प्रत्यक्षही तुडवू! : सीताराम गावडे ; राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा सावंतवाडीत तीव्र निषेध.!

सावंतवाडी : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. याचे तीव्र पडसाद तळकोकणात देखील उमटले आहेत. सावंतवाडी येथे श्री. सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारमत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. हिंदुस्थानात राहायच असेल तर शिवरायांचा आदर राखावा लागेल. अन्यथा, त्यांनी पाकिस्तानात जावं. भले आता माफी मागितली असली तरी त्यांना सोडणार नाही. आज बॅनरवर तुडवल, उद्या प्रत्यक्षही तुडवू, असा इशारा सीताराम गावडे यांनी दिला.

सावंतवाडी येथील राजा शिवछत्रपती चौक येथे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यान त्यांचे तीव्र पडसाद उमटले. यावेळी उपस्थितांनी राहुल सोलापूरकर यांच्या बॅनरवर जोडे हाणत त्यांची प्रतिमा पायाखाली तुडवली. त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे म्हणाले, आमचे श्रद्धास्थान, हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जो कोणी अपशब्द बोलेल त्याचा निषेध करत त्याला जुत्याने मारल जाईल. राहुल सोलापूरकर यांनी सिंधुदुर्गात प्रत्यक्ष दौरा केला तर त्यांचा तोंडाला काळं फासू असा इशारा दिला. तसेच भले आज माफी मागितली असली तरी कोणाच्यातरी सांगण्यावरून त्यांनी हे विधान केले आहे. या हिंदुस्थानात राहायचं असेल तर शिवाजी महाराजांचा आदर करावाच लागेल. अन्यथा, त्यांनी पाकिस्तानात जावं. हिंदुस्तानात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यांना सोडणार नाही. आज बॅनरवर तुडवलं उद्या प्रत्यक्षही तुडवू असा इशाराही श्री. गावडे यांनी यावेळी दिला. उपस्थित शिवभक्तांनी श्री. सोलापूरकर यांच्या विधानाचा संतप्त प्रतिक्रिया देत निषेध नोंदविला. यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव, तानाजी पाटील, बंटी माटेकर, अमित वेंगुर्लेकर, उमेश खटावकर, मनोज घाटकर, अवधूत सावंत, गणेश सूर्यवंशी, रामा वाडकर आदींसह शिवभक्त उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles