Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

जग कधी नष्ट होणार? न्यूटनचं ३०० वर्षांपूर्वीचे पत्र समोर! ; थेट तारीखच सांगितली, भयंकर भाकीत.

नवी दिल्ली : आपल्या सोबत काय घडणार? हे जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. सोबतच जगाचा अंत कधी होणार असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. मानवाला पडलेल्या अशा प्रश्नांचं उत्तर फक्त ज्योतिषीच देत नाहीत, तर तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल एका प्रसिद्ध शास्त्रज्ञानं देखील जगाच्या अंताबाबत मोठं भाकीत केलं आहे. या शास्त्रज्ञानं अनेक शोध लावले, त्याने लावलेल्या शोधामुळे तो जगभरात ओळखला जाऊ लागला. हा व्यक्ती केवळ शास्त्रज्ञच नव्हता तर तो एक धर्म अभ्यासक देखील होता. आपण ज्या व्यक्तीबाबत बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन आहे. न्यूटनने आपल्या एका पत्रामध्ये जगाचा अंत कधी होणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची ही जगाविषयीची भविष्यवाणी धर्मग्रंथावर आधारीत आहेत. न्यूटनने केलेल्या भविष्यवाणीनुसार जागाचा अंत हा अवघ्या काही दशकानंतर होणार आहे.

एका पत्रात केली भविष्यवाणी –

300 वर्षांपूर्वीच एका पत्रामध्ये न्यूटनने जगाच्या अंताबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. न्यूटनने केलेली ही भविष्यवाणी ही गणितीय गणनाच्या आधारावर असल्याचा दावा केला जातो. न्यूटनचा बायबलवर विश्वास होता, त्याच आधारे त्याने जग केव्हा नष्ट होणार? याबाबत भविष्यवाणी केल्याचं बोललं जातं. न्यूटनने आपल्या या पत्रात म्हटलं आहे की, एक मोठी लढाई होईल, ही लढाई म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात असेल.हे जग नष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जगाची निर्मिती होईल, ज्यामध्ये शातंताच शांतता असेल असं न्यूटनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

न्यूटनने ज्या पत्रामध्ये ही भविष्यवाणी केली आहे, ती भविष्यवाणी करताना त्याने त्याच्या काळात उपलब्ध असलेली कालमापन पद्धत आणि तारखेचा उपयोग केला आहे. त्याने जग केव्हा नष्ट होणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. न्यूटनने जे भाकीत वर्तवलं आहे, त्यासाठी त्याने बायबलचा आधारा घेतला आहे. न्यूटनने आपल्या या पत्रात त्या काळातील ज्या तारखेचा उल्लेख केला आहे, त्यानुसार हे जग 2060 मध्ये नष्ट होणार आहे, असं हे पत्र सांगतं. दरम्यान अशीच काहीशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी देखील केली आहे.

(विशेष सूचना : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles