Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

गवा रेड्याच्या ठोकरने मृत्यू झालेल्या व्यक्तीस आर्थिक मदत द्या! ; मनसेची वनविभागाकडे मागणी.

सावंतवाडी : दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी कुडाळ येथे कामावर जात असलेल्या जॉकी फर्नांडिस रा. कारिवडे यांना हुमरस येथे मुख्य रस्त्यावरून जात असताना गवा रेड्याने ठोकर दिलेली होती या अपघातात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान नियमांवर बोट ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात येत असल्याची बाब मनसेच्या कानावर नातेवाईकांनी घातली होती. याबाबत जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने वनसंरक्षक यांची भेट घेवून या कुटुंबाला मदत करण्यासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्याची मागणी केली असता आपण सदर प्रस्ताव तात्काळ तयार करून पाठवतो असे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे. वन्य प्राण्याने हल्ला केला असता मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये मदत देण्याची तरतूद आहे. दरम्यान या वेळी शहर अध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुका सचिव सतीश आकेरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles