Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

रेडी येथील किल्ले यशवंत गडावर शिवजयंती उत्सव शिवप्रेमींच्या उपस्थितीत साजरा.! ; दुर्गरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने महाराजांना मानाचा मुजरा.

वेंगुर्ला : रेडी येथील दुर्गरक्षक प्रतिष्ठान (शिवप्रेमी यशवंतगड)व समस्त शिवप्रेमींच्या वतीने बुधवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिवजयंती उत्सव रेडी येथील ऐतिहासिक राज्यसंरक्षित स्मारक असलेल्या यशवंतगड किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या उत्सवाचे औचित्य साधून मंडळाच्यावतीने विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यनिमित्त सकाळी ०७.३० वाजता शिरोडा येथील श्री देवी माऊलीची ओटी भरून बाईक रॅलीने सुरुवात होऊन ०८.०० वाजता शिरोडा बस स्थानक येथील शिवजयंती पुजन व त्यानंतर शिरोडा बाजारपेठेतून बाईक रॅली ही ०८.४५ वाजता रेडी ग्रामपंचायत येथे थांबून नंतर रेडीची ग्रामदेवता श्री देवी माऊली मंदिराकडे ओटी भरून किल्ले यशवंतगड येथे शिवप्रतिमा व पालखी बाईक रॅली गडाच्या पायथ्यापाशी पोहोचली. गडाच्या पायथ्याकडून पालखी व शिवप्रतिमेवर फुलांची उधळण व जयघोष करीत १०.०० वाजता किल्ले यशवंतगड येथे पूजनस्थळी पालखी पोहोचली . त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक रेडी ग्रामपुरोहित श्री सिद्धेश जोशी यांनी मूर्तीपूजन करून ११.०० वाजता शिववंदना,ध्येयमंत्र,प्रेरणा मंत्र होऊन सर्व रयतेसाठी शिवपूजनाची सुरुवात झाली. उपस्थित सर्व महिला वर्गासाठी हळदीकुंकू कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना भेटवस्तू वाटप होऊन. ११.३० वाजता जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा सुरु झाली. दरम्यान संस्थेच्या वतीने गडावर ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर राणे,मळगाव यांच्या मार्गदर्शनाने ठेवण्यात आले होते. दुपारी १.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली.
जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये पौराणिक विषयावर सादरीकरणामध्ये प्रथम पारितोषिक ₹१००१/- श्री निखिल स्वागता शरद तानावडे, बांदा यांच्याकडून पुरस्कृत प्रथक क्रमांकाचा मानकरी होडावडा येथील कु.उत्तम श्रीकृष्ण कोंडूसकर याच्या स्वामी समर्थ भूमिकेने पटकावला. तर ₹७०१/- सौ. अनसा वासुदेव भगत,रेडी पुरस्कृत द्वितीय क्रमांक ईशा संदीप कुंभार हिच्या द्रौपदी भूमिका व ₹५०१/- श्री ज्ञानेश्वर राणे,मळगाव पुरस्कृत तृतीय क्रमांक कु.श्रियांश टिक्कस याने पटकावला. सर्व लहान गटातील विजेत्यांना श्री वासुदेव(आबा) भगत यांच्याकडून चषक पुरस्कृत करण्यात आले होते.
माध्यमिक गटामध्ये पारितोषिक ₹ १५०१/- सौ.शितल साळगावकर,शिरोडा, पुरस्कृत प्रथम क्रमांकाची मानकरी कु भक्ती सुनील राणे,द्वितीय ₹१००१/- सौ मिनल मंगेश पंडित,रेडी पुरस्कृत विजेता कु.काशिनाथ संतोष तेंडोलकर व तृतीय ₹७०१/- श्री ज्ञानेश्वर राणे, मळगाव पुरस्कृत,विजेती कनक काळोजी. सर्व विजेत्यांना चषक सौ.साक्षी वाडकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आले होते.
खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक ₹ २००१/- विजेती सानिया वराडकर,द्वितीय ₹१५०१/- ऋतुजा नाईक तर तृतीय ₹१००१/-होनाजी नाईक ही सर्व पारितोषिक रेडकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर,रेडी यांच्याकडून पुरस्कृत व निर्वेद चक्की फ्रेश आटा, आरोंदा त्यांच्याकडून सर्व विजेत्याना चषक पुरस्कृत करण्यात आले होते.स्पर्धेत सहभागी लहान स्पर्धकांना सन्मानचिन्ह श्री चंद्रकांत केदार रेडी बोंबडोजीचीवाडी (मुंबई) यांनी पुरस्कृत केली होती. सदर स्पर्धेचे परीक्षण श्री अशोक तेंडुलकर व श्री. गोलतकर सर ह्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.समर्थ गवंडी यांनी केले. स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
तरी या उत्सवात उपस्थित राहून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यास आर्थिक व वस्तुरूप मदत करणाऱ्या सर्व दात्यांचे खूप खूप आभार दुर्गरक्षक प्रतिष्ठान,रेडी(शिवप्रेमी यशवंतगड) च्यावतीने समस्त शिवप्रेमींचे आभार मानण्यात आले.

ADVT – 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles