कुडाळ : बँक ऑफ महाराष्ट्रमधील सर्व सेवानिवृत्तांचा स्नेहमेळावा २ मार्च रोजी येथील मराठा समाज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमधील सर्व निवृत्ती वेतनधारकांना मार्गदर्शन करण्याकरिता बँक कर्मचाऱ्यांचे ज्येष्ठ नेते कॉ. विश्वास उटगी उपस्थित राहणार आहेत. सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘पेन्शन अपडेशन’ या प्रश्नावर ते मार्गदर्शन करणार आहेत. सन २००१ पासून बँकेतील कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले असून आज बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येएवढीच निवृत्तांचीही संख्या अस्तित्वात आहे. या सर्वांच्या पेन्शनसंबंधी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
त्याबाबत उटगी मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांतील सर्व निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र रिटायरिज असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षा नीता गोवेकर यांनी केले आहे.
ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


