सावंतवाडी : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना सातारा येथे जाऊन राजे प्रतिष्ठान कामगार सेना सिंधुदुर्ग, शाखा यांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांनी आवर्जून राजे प्रतिष्ठान कामगार सेना कार्यकर्ते यांची चौकशी केली. आपले काम सघटनेच्या माध्यमातून अखड चालू ठेवा. आपले सहकार्य तुम्हाला कायम मिळणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेना राज्य अध्यक्ष जितेंद्र काकासाहेब खानविलकर, सिंधुदुर्ग शाखा जिल्हा अध्यक्ष संतोष तळवणेकर,उपाध्यक्ष मंगेश माणगांवकर, जिल्हा सचिव रामचंद्र कुडाळकर, जिल्हा खजिनदार ज्ञानेश्वर पारधी, जिल्हा संपर्क प्रमूख शिवा गावडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष पुजा सोन्सुरकर, तालुका अध्यक्ष संचिता गावडे, सेजल पेडणेकर, समिक्षा मोघे, संगीता पारधी, अंकिता माळकर, एकनाथ शेट्ये तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्यावर महाराष्ट्र राज्यातील अनेक भागातून मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव झाला. तसेच हजारो कार्यकर्ते राज्यभरातून आले होते.


