सावंतवाडी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी गोपुरी – वागदे येथे सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ सिंधुदुर्गचा मंगलमय स्नेह मेळावा व वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्नेह मेळावा वधू-वर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने बौद्ध समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन सेवानिवृत्त संघटनेच्या पदाधिकाऱ्याने एका पत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्यातील सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाने संघटित होत या संस्थेची स्थापना करून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प सुरू केला आहे त्यानुसार दरवर्षी वधू-वर पालक परिचय मेळावा घेऊन उपवर मुला मुलींना अनुरूप स्थळ निवडता यावेत हा एक सूत्र उपक्रमाही सुरू केला आहे तसेच सेवा नृत्य झालेल्या जिल्ह्यातील बंधू भगिनींना एकत्र येत विचारांची वैचारिक देवाण-घेवाण घडावी त्यासाठी हा मंगल मैत्रीचा अविष्कार या हेतूने या मंगल मैत्री स्नेह मेळाव्याचे संयुक्त आयोजन करण्यात आले आहे . त्यानुसार नऊ मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी साडेचार या वेळेत गणपतराव सावंत सभागृह प्रशिक्षण केंद्र गोपुरी, नाईक पेट्रोल पंपाच्या मागे वागदे तालुका – कणकवली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी विवाहो इच्छुक वधू-वर यांनी आपल्या पालकासह तसेच सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन संघटने केले आहे. वधू वर नोंदणीसाठी कणकवली – सिद्धार्थ तांबे (9422350773), देवगड – विजय कदम (8600723901), मालवण रूपाली पेंडूरकर (9421263496), कुडाळ – आर. डी. कदम (9420739248), सावंतवाडी – मोहन जाधव (9423880153), वेंगुर्ला – अशोक सावळे (9421144272), वैभववाडी – सुभाष कांबळे (9552634497), एम. बी. कदम (9423511902) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सरचिटणीस मिलिंद सर्पे, कार्याध्यक्ष के. एस. कदम, उपाध्यक्ष आनंदकुमार धामापूरकर, अध्यक्ष सूर्यकांत कदम व तथागत पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजु यांनी केले आहे.