सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर हायस्कूल या दहावीच्या केंद्रावर(8405) हिंदी विषयाच्या पेपरच्या 03 मार्च दिवशी पार्किंगमध्ये रुपये-1300/- ही रक्कम कुमार सिद्धेश गुरुनाथ घाडी रा.माजगाव यांना मिळाली. आपल्या अंगी असलेले प्रामाणिकपणा गुण दाखवून सदर रक्कम प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांच्याकडे सुपूर्द केली. अजूनही समाजामध्ये प्रामाणिकपणाचे मूल्य जोपासले जाते याची प्रचिती सिद्धेश घाडीने दाखवून दिली. मुख्याध्यापक यांनी सिद्धेश घाडीच्या प्रामाणिकपणाबद्दल संस्था, प्रशाला यांच्यावतीने विशेष कौतुक केले.
सिद्धेश घाडी हा पशुवैद्यकीय कर्मचारी तसेच पेपर वितरण करणारे श्री गुरुनाथ घाडी रा. माजगाव यांचा मुलगा असून त्याच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धेश घाडी ह्या परिक्षार्थीचा प्रामाणिकपणा.! ; रस्त्यात मिळालेले पैशांचे पाकीट कळसुलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडे केले सुपूर्द.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


