सावंतवाडी : प्रसारमाध्यमे समाज घडवू शकतात आणि बिघडवूही शकतात. प्रिंट मीडियाने आतापर्यंत विश्वासार्ह पत्रकरिता केली परंतु बदलत्या युगातील डिजिटल मीडियावर प्रिंट मीडिया सारखा अंकुश नसल्याने नकारात्मक भूमिका असलेली मीडिया समाजाला उध्वस्त देखील करू शकेल असा गंभीर इशारा देत आपण नकारात्मक वागायचे की सकारात्मक याचा विचार मीडियाने केला पाहिजे असे प्रतिपादन मुंबई दूरदर्शनचे माजी संचालक आणि निर्माते जयू भाटकर यांनी येथे केले.
लायन्स इंटरनॅशनलच्या कोकण विभागाची विभागीय परिषद सावंतवाडी येथे रिजन चेअरमन ला. गजानन नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी प्रांतपाल एड. एम के पाटील, उपपंतपाल डॉ. वीरेंद्र चिखले, माजी प्रांतपाल ला. केशव फाटक, कॉन्फरन्स चेअरमन ला. संतोष चोडणकर, रिजन सेक्रेटरी अमेय पै यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली. त्याप्रसंगी पाहुणे प्रमुख वक्ते म्हणून श्री. जयू भाटकर बोलत होते. ते पुढे म्हणाले प्रिंट मीडियाकडून बातम्या छापताना त्यावर संस्कार करण्यासाठी एक यंत्रणा असते परंतु आता हातात मोबाईल असल्याने प्रत्येक जण संपादक मालक बनला आहे त्याच्यावर दुसऱ्या कोणाचा अंकुश नसल्याने त्याला वाटेल ते तो प्रसारित करू शकतो हे समाजाला धोकादायक आहे.
लायन्सच्या कोकण विभागीय परिषदेला रत्नागिरी जिल्ह्यातून दापोली, खेड,लोटे, गुहागर चिपळूण ,रत्नागिरी, संगमेश्वर पासून सावंतवाडी मालवण कुडाळ कणकवली आदी सुमारे 18 लायन्स क्लबने सहभाग घेतला होता .लायन्स क्लबच्या सेवाकार्याची माहिती आणि आढावा या परिषदेत घेण्यात आला. रिजन चेअरमन गजानन नाईक यांनी रिजन मधील 18 ही क्लबचा आढावा घेताना भावी कार्याची दिशा स्पष्ट केली. रिजन मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 75 जणांना अवार्ड देऊन गौरविण्यात आले.
प्रांतपाल एड. एम.के पाटील यांनी कोकण मधील या रिजनच्या कार्याचे कौतुक करून समाजाभिमुख काम करण्याचे आवाहन केले. माजी प्रांतपाल ला. केशव फाटक, ला .डॉ. विरेंद्र चिखले यांचीही भाषणे झाली. विभागीय परिषदेत रिजन मधील चारही झोन चेअरमन ला. विश्वास गावकर ,ला. डॉ. निलेश पाटील ,ला. प्रांजल गुंजोटे आणि ला शुभदा पोटे यांनी आपापल्या विभागातील क्लबच्या लायन्स सेवा कार्याची माहिती दिली .
ला संतोष चोडणकर,
ला अमेय पै यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले .एड. अभिजीत पणदूरकर यांनी आभार मानले. विभागीय परिषदेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी रिजन चेअरमन मालवणचे श्री. गणेश प्रभुलकर आणि मिताली मोंडकर यांनी केले .
या परिषदेसाठी ज्येष्ठ लायन आप्पा वणजू ,ऍड. अजित भणगे, एड. परिमल नाईक, राजन पोकळे, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. अभिजीत जोशी ,गंगाप्रसाद बंडेवार, एड. जमदग्नी ,डॉ. किरण खोराटे आणि रिजन मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेत सिंधुरत्न या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच लायन क्वीज टेस्ट, बॅनर प्रेझेंटेशन, लकी ड्रॉ यासारखे उपक्रम राबवण्यात आले. सावंतवाडी लायन्स क्लब सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने क्लबला स्पेशल अवार्ड देऊन सावंतवाडी लायन्स क्लब चा सन्मान करण्यात आला.
ADVT –