Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

सहवेदना – सेवानिवृत्त आदर्श शिक्षक अरुण दत्तात्रय परब तथा ‘परब गुरुजी’ यांचे निधन.

कुडाळ : सेवानिवृत्त शिक्षक अरुण दत्तात्रय परब तथा परब गुरुजी यांना बुधवार दिनांक 14 आगस्ट 2024 रोजी पहाटे चार वाजून 45 मिनिटांनी वयाच्या 78 व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, दोन मुली, जावई, नातवंडे तसेच भाऊ, बहिणी, पुतणे, भाचे असा मोठा परिवार आहे. पिंगुळी सरदारवाडी येथील रहिवासी प्रकाश परब यांचे ते वडील बंधू होयत. पनवेल महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनिअर प्रसाद परब व मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत असणारे प्रवीण परब यांचे ते वडील होटी. तर काळसे येथील बिल्डर तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर योगेश राऊळ व लार्सन अँड टुब्रोमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असलेले सुनील साळुंखे यांचे ते सासरे होते. तसेच कुडाळ, वेंगुर्ला येथील सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. एम. आर. परब यांचे ते मोठे मेहुणे व ज्ञानज्योत अकॅडेमी, पुणे यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंधुदुर्ग येथील परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्रा. राजाराम परब यांचे ते मोठे मामा होते.

ते एक आदर्श, मनमिळावू, विद्यार्थी प्रिय, अजातशत्रू असे शिक्षक होते. चेहऱ्यावर नेहमी निखळ हास्य असणारे व्यक्तिमत्व म्हणजे परब गुरुजी होय. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांबरोबर समानतेने वागणारे परब गुरुजी उत्कृष्ट कलाकार होते. मुलांना शिक्षणाचे धडे देताना आपले हस्ताक्षर लिखाण, टापटीपणा याकडे विशेष लक्ष कसे द्यावे त्याचे मार्गदर्शन करीत असत. इंग्रजी व गणित हा त्यांचा आवडता विषय हसतखेळत काळ, काम, वेगाचे गणित कसं सोडवायचं?, हे परब गुरूजींकडूनच शिकायचे, असे आजही निवृत्तीच्या  वाटेवर असलेले त्यांचे विद्यार्थी आवर्जून सांगतात.

शिक्षण क्षेत्राबरोबरच परब गुरुजींना पशुधनाची सेवा करणे, आधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी जनावरे पाळली पाहिजे, म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर स्वतः पदरमोड करून लोकांचे प्रबोधन करण्याचे कार्य जवळजवळ चार वर्षे परब गुरुजी यांनी केले. त्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त डॉ. काकडे साहेब, व लघु पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालय कुडाळ येथील सहाय्यक आयुक्त डॉ. परचुरे साहेब यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा खास गौरव केला. त्यांचे मूळ गाव देवगड तालुक्यातील हिंदळे गिरावळवाडी होय. सुख वस्तीसाठी त्यांनी कुडाळ लक्ष्मीवाडी येथे घर बांधले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles