Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत.! ; मनसेनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन.!

कुडाळ : येथील तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी यात लिहून टाकाव्यात, याची दखल खुद्द तहसीलदार घेणार, अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसीलदार यांनी केले.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांकरिता येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येतात, उदा. शासकीय, शालेय कामांचे विविध दाखले, महसुल सबंधीत कामे, विविध शासकीय योजना करिता लागणारी कागद पत्रे अशात अनेकदा प्रशासकीय कर्मचारी किंवा नेटवर्क अडथळा यामुळे नागरिकांच्या अनेक खेपा होतात. अशावर नियंत्रण आणणे आणि कारभार पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने कुडाळ तहसीलदार यांनी सूचनापेटी लावण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. अशाच प्रकारे शासनाच्या इतरही विभाग प्रमुखांनी आप आपल्या कार्यालयांमध्ये सूचना/तक्रार पेटी जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्यास . जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामात होणाऱ्या अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊन त्यावर योग्य कार्यवाही करणे सोपे जाईल.
आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत तहसीलदार श्री वीरसिंग वसावे यांना पुष्पगुच्छ देऊन या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles