Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

उपअभियंता अंगद शेळके यांनी केली कुणकेरी रस्त्याची पाहणी.! ; ‘मनसे’ मागणीचा परिणाम.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी लिंगाचीवाडी येथील रस्त्याचं राहिलेलं अर्धवट काम यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हा परिषद उपअभियंता श्री.अंगद शेळके यांची भेट घेण्यात आली होती. त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातील अनेक रस्त्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कुणकेरी लिंगाचीवाडी येथील रता पूर्णपणे खराब झाला होता व त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून अपघात झाले होते. यासंदर्भात केतन सावंत यांनी लक्ष वेधले असता त्याची आज पाहणी करण्यात आली. सदर रस्ता आराखडा मध्ये प्राधान्याने सामाविष्ट करून लवकरात लवकर कसा करता येईल, याकरीता प्रयत्न करु व रस्ता डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यात करीता ग्रामपंचायत प्रशासनला कळविण्यात येईल.

तसेच निगुडे ग्रामपंचायत हद्दीतील काही कामे शिल्लक आहेत. निगुडे नवीन देऊळवाडी येथील साकव या संदर्भातील चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितलं की सचिन पालव हे ठेकेदार कामा घेत असून काम वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळे त्यांची तक्रार आहे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे असे श्री शेळके यांनी सांगितले त्याचप्रमाणे आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर यांनी आपल्या भागातील रस्ते, शाळा दुरुस्ती याबाबत अधिकारी यांच्याशी चर्चा केली व सदर कामे मार्चपूर्वी तालुक्यातील सर्व कामे पूर्ण करा कुठेही काम थांबता कामा नये आपण आपल्या स्तरावर योग्य ती दखल घेऊन कामे पूर्णतत्त्वास न्या असे उपअभियंता श्री अंगद शेळके यांना मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले त्याचप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल योजनेचे घरे पूर्ण होऊनही दाखले मिळण्यास विलंब होतो या संदर्भातही शहानिशा करा यावर आपण योग्य ती कार्यवाही करू, असे आश्वासन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, उपतालुकाध्यक्ष राजेश मामलेदार, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व हर्षद नाईक आदी उपस्थित होते.

ADVT –

सुवर्णसंधी.! – उद्या कुडाळ येथे निवेदन व भाषण प्रशिक्षण शिबीर!, दिग्गज पाडणार वक्तृत्व कलेचे पैलू. ; आधार फाऊंडेशन सिंधुदुर्गचा उपक्रम, लाभ घेण्याचे ॲड. नंदन वेंगुर्लेकर यांचे आवाहन.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles