Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल, ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार! ; सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आम. दीपक केसरकर यांचा ठाम विश्वास.

सावंतवाडी : काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे‌. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल, असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आम. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते बोलत होते.

ते म्हणाले, २ लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. ३ हजार २०० कोटीच काजू बोंड वाया जात. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झालं असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात. दौऱ्यात यावर अभ्यास केला गेला. तसेच नॉन डिस्क्लोझर करार या दौऱ्यात करण्यात आला आहे‌. लवकरच या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार आहेत. त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरू केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.

तसेच ब्राझील येथे भारतील गाईंच संवर्धन ब्राझीलमध्ये केलं गेलं आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहे‌त. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीच तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असं त्यांनी सांगितलं.सावंतवाडी शहरात देखील पर्यटन विकास होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles