सावंतवाडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 1932 सावंतवाडी भेट ही सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक व क्रांतिकारक घटना असून या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन हे स्थळ सामाजिक समतेच्या उभारणीत प्रेरणादायी व्हावे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच समाजाने पुढे यावे, असे आवाहन समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष दीपक पडेलकर यांनी शनिवारी दोडामार्ग येथे केले. दोडामार्ग येथील सुधाकर कॉम्प्लेक्स येथे दोडामार्ग तालुक्यातील कृतिशील व विचारशील कार्यकर्त्यांची सहविचार सभा शनिवारी सायंकाळी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी दोडामार्ग येथील कार्यकर्ते विजय जाधव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रेरणा भूमीचे सचिव व पत्रकार मोहन जाधव यांनी 1932 ची बाबासाहेबांची तळकोकणातील सावंतवाडी येथे झालेली भेट आणि त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांच्या घेतलेल्या मेळाव्याच्या ठिकाणी सावंतवाडी नगरपालिकेने उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यानाची माहिती सांगून या पवित्र स्थळाचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्यासाठी सर्व समाजाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
सर्वप्रथम महिला दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन उपस्थित सर्वच महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत प्रेरणाभूमीचे कार्याध्यक्ष तथा साहित्यिक अंकुश कदम यांनी प्रेरणाभूमी स्थळाचे महात्म्य सांगून तेथील समस्या ही अधोरेखित केली. तसेच सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून येथे काय काय निर्माण करता येईल?, याबाबत आपली भूमिका विशद केली. यावेळी चर्चेत ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश जाधव, दीपक जाधव, विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, हरिचंद्र मनेरकर यांनी चर्चेत भाग घेतला. शेवटी कांता जाधव यांनी आभार मानले. यावेळी कृष्णा कदम, आनंद सम्राट, भगवान जाधव, शंकर जाधव, प्रेमानंद पालेकर, वैशाली जाधव, रूपवती जाधव, सोनिया जाधव, रुक्मिणी जाधव, मोहिनी जाधव, सत्यवती जाधव, विधी जाधव, रितिका जाधव, रत्नावती जाधव आदी महिला तसेच पुरुष मंडळी उपस्थित होते.
ADVT –



सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


