सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त सावंतवाडीत सकल हिंदू समाजाच्या वतीने छावा या ऐतिहासिक चित्रपटाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि संघर्षमय जीवनाचा धगधगता इतिहास उलगडणारा आहे.
शिवाजी महाराजांप्रमाणे संभाजी महाराजांचाही खरा इतिहास समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. तरी समस्त शिवशंभू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
▶ दिनांक: ११ मार्च २०२५ (मंगळवार)
▶ वेळ: संध्याकाळी ६:३० वाजता
▶ ठिकाण: सावंतवाडी (जगन्नाथ राव भोसले उद्यानाजवळ)
सर्व शिवभक्तांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षात्कार घ्याव, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


