सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा – न्हयबाग पुल धोकादायक बनला असून महाराष्ट्र राज्याच्या बाजूने रस्ता आणि पुलाच्या मध्ये घातलेल्या स्टीलच्या प्लेट्स तुटून दोन महिने झाले. तसेच याबाबत संबंधित यंत्रणेला याबाबत कल्पना देऊनही व संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून महिना झाला तरी याबाबत प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात न आल्याने येथील वाहनचालक, नागरिक नाराज असून एखादा बळी जाण्याची वाट प्रशासन बघत आहे काय? अशी बातमी मंगळवार दिनांक ११ मार्च २०२५ रोजी ‘सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज’ या चॅनेलला प्रसिद्ध होताच त्याची २४ तासाच्या आत सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तुटलेल्या स्टीलच्या प्लेट्स काढून त्याठिकाणी नवीन स्टीलच्या प्लेट्स बसवण्याचे काम आज बुधवार दि. १२ मार्च २०२५ रोजी सुरु केले आहे. त्यामुळे वाहन चालक, स्थानिकांनी समाधान व्यक्त करुन सत्यार्थ न्यूज आणि पत्रकार संजय पिळणकर यांचे विशेष आभार मानले आहेत.

तसेच ही तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना न करता सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
ADVT –




