नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतारळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. मात्र आता त्यांच्याबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सुनिता आणि बुच या दोघांचीही पावलं लवकरचं जमिनीवर पडणार आहेत. अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि विल्मोरला घरी रत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने त्यांचे अंतराळ यान पाठवले आहे. शुक्रवारी (स्थानिक वेळेनुसार) नासा आणि स्पेसएक्सने एक महत्त्वपूर्ण क्रू मिशन लॉन्च केले. या मिशनद्वारे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणले जाणार आहे. त्यामुळे काहीच दिवसात ते पृथ्वीवर वापसी करतील. त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कधी लाँच झालं मिशन ?
मिळालेल्या माहितीनुसार, फॉल्कन 9 रॉकेटने शुक्रवारी संध्याकाळी 7:03 वाजता (स्थानिक वेळेनुसार) फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले. क्रू ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटच्या वर बसवण्यात आली होती, त्यामध्ये चार सदस्यांची टीम घेऊन जाण्यात आली. 19 मार्चपर्यंत सुनिता आणि बुच हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधून बाहेर पडतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अंतराळात कोण गेलं ?
या नव्या मिशनमध्ये चार सदस्यांचा क्रू अंतराळात गेला आहे, त्यामध्ये नासाच्या ॲन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, जपानची अंतराळ संस्था JAXA अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रशियाची रॉसकॉसमॉस एजन्सी किरिल पेस्कोव्ह या चौघांचा समावेश आहे. ते सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची स्पेस स्टेशनमध्ये जागा घेतील. यापूर्वी, तांत्रिक कारणांमुळे स्पेसएक्सचे केनेडी स्पेस सेंटर (फ्लोरिडा) येथून क्रू-10 मिशनचे प्रक्षेपण पुढे ढकलावे लागले होते.
पृथ्वीवर कधी परतणार सुनिता विल्यम्स ?
जेव्हा त्यांचे अंतराळयान 15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचेल आणि डॉक करेल, तेव्हा चार अंतराळवीर काही दिवस तेथील वातावरणाशी जुळवून घेतील. यानंतर ते क्रू-9 कडून काम स्वीकारतील. क्रू-9 चे सदस्य 19 मार्च रोजी पृथ्वीसाठीरवाना होतील. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे जून 2024 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. ते दोघेही बोईंगच्या स्टारलाइनरमधून आठ दिवसांच्या ISS मिशनवर गेले होते. बोईंगची स्टारलाइनर कॅप्सूल, जी त्यांना अंतराळात घेऊन गेली होती ती खराब झाली, त्यानंतर कॅप्सूल त्यांच्याशिवाय पृथ्वीवर परत आली. अखेर 9 महिन्यांनी त्या दोघांचा घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ADVT –
सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


