सावंतवाडी : संदीप गावडे फाऊंडेशनच्यावतीने सावंतवाडी तालुकास्तरीय मर्यादित फक्त चौथीसाठी यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा २०२५ चे रविवार १६ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे.
ही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा माडखोल केंद्रशाळा, सांगेली केंद्रशाळा, आंबोली सैनिक स्कूल, मळेवाड शाळा नं १, मळेवाड नं २, सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल आणि बांदा केंद्रशाळा येथे होणार आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळीच उपस्थित रहावे असे, आवाहन संदीप गावडे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे युवा नेते संदीप गावडे, अध्यक्ष सुधीर गावडे, सचिव दत्ताराम सावंत यांनी केले आहे.