सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे यांच्या स्वखर्चाने व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पुढाकारातून संस्थानाचे तात्कालीन महाराज बापूसाहेब भोसले यांच्या पुतळ्याची डागडूजी करण्यात आली असून तेथील परिसर सुशोभित करण्यात आला आहे.
उद्या दिनांक 30 मार्च गुढीपाडवा व मराठी नववर्षाचे औचित्य साधून उद्या सकाळी 11 वाजता राजघराण्यातून
बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार हार अर्पित करण्यात येणार आहे. तरी या शुभप्रसंगी शहरवासीयांना उपस्थित राहण्याची विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
ADVT –



