सावंतवाडी : नुकत्याच झालेल्या न्यायाधीश परीक्षेत ओटवणे-करळगाळूवाडी गावची कन्या गौरी राऊळ ही राज्यात ३४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून गौरी व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
गौरी ही पुण्यातच लहानपणापासून वाढली. तिपे पुणे विद्यापीठातून एल. एल. बी, व एल. एल. एम. चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पाच वर्षे वकीली केली आणि अथक प्रयत्नानंतर एम. पी. एस. सी. परीक्षा पास होत भारतीय न्यायालयाच्या ‘न्यायाधीश’ म्हणून मानाचा तुरा रोवला आहे. गौरीच्या या अतुलनीय यशाबद्दल गौरीचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
ADVT –





