सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, एससीईआरटी, पुणे यांनी २०२३/२४ मध्ये शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंत शिकवणाऱ्या ९०० शिक्षकांनी भाग घेतला होता. एससीईआरटी, पुणे यांनी निकष आणि कौशल्याच्या आधारे २०८ व्हिडिओ निवडले. यात मिलाग्रीस हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका आसुम्पतीना मायकल माडतीस यांनी सावंतवाडी तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांनी नुकतेच ओरोस येथील पत्रकार भवनात सत्कार समारंभ आणि कार्यक्रम आयोजित केला होता. यात मिलाग्रीस हायस्कूलच्या शिक्षिका आसुम्पतीना मायकल माडतीस यांनी तालुका स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते मिलाग्रीस हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका आसुम्पतीना माडतीस यांना सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, मिलाग्रीस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती संध्या मुणगेकर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ADVT –



