सावंतवाडी : येथील आरपीडी कॉलेजचे सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर राणे यांचे गोवा – बांबोळी येथे उपचारादरम्यान आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व दोन मुलगे आहेत.
त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या अचानक जण्याने सामाजिक, शैक्षणिक स्तरावर हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.



