अलवर : एका पोलीस अधिकाऱ्याची लव्हस्टोरी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पतीची तक्रार घेऊन पोलीस अधिकाऱ्याकडे गेलेल्या महिलेच्या प्रेमात पडला. तिला लग्नाचे आश्वासन देऊन पोलीस अधिकाऱ्याने शारिरीक संबंध ठेवले. पण जेव्हा त्या महिलेने लग्नाचा आग्रह धरला तेव्हा पोलीस अधिकाऱ्याने जे काही केलं ते पाहून सर्वजण चकीत झाले.
2022मध्ये झाली ओळख –
पीडित महिला अरवली विहार, अलवर येथील रहिवासी आहे. 2022 मध्ये महेंद्रसिंग राठी यांची राजस्थानमधील कुम्हेरमध्ये पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी पीडित महिलेचा पतीसोबत वाद सुरु होता. त्यानंतर तिने या प्रकरणासंदर्भात महेंद्र राठी यांची भेट घेतली. त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर पोलीस अधिकारी महिलेला वारंवार फोन करू लागला.
मी तुम्हाला फक्त…
महिलेचा आरोप आहे की, एकदा तिला कोर्टाची तारीख होती. त्यानंतर महेंद्र राठी न्यायालयाबाहेर आले. मी कोर्टातून बाहेर पडताच ते म्हणाले, मी तुम्हाला बस स्टँडवर सोडतो. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि गाडीवर बसले. पण तो मला दुसरीकडे घेऊन जाऊ लागला. मी म्हणाले हा रस्ता बसस्थानकाकडे जात नाही. तेव्हा महेंद्र म्हणाले की आपण माझ्या घरी जात आहोत. तिथे पाणी पिऊन झाल्यावर मी तुला बस स्टँडवर सोडतो. पण, सरकारी क्वार्टरमध्ये त्याने माझ्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर महेंद्रने महिलेला सांगितले की, त्याचे तिच्यावर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करायचे आहे. मला तू आवडतेस. विश्वास बसत नसेल तर चल बरसाना येथील राधा राणी मंदिरात जाऊ. त्यानंतर तो महिलेला मंदिरात घेऊन गेला. तेथे त्याने दगडावर अंगठा चोळण्यास सुरुवात केली. अंगठ्यामधून रक्त आल्यावर त्याने त्याचा वापर सिंदूर म्हणून केला.
लग्नाला नकार दिला –
महिलेने घरी जाऊन हा प्रकार आपल्या भावाला सांगितला असता त्याने या नात्यावर विश्वास नसल्याचे सांगितले. तेव्हा महिलेने सांगितले की, महेंद्रने माझ्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले आहे. मग घरी आल्यावर त्याने माझ्याशी साखरपुडा केले. यानंतर महेंद्रने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. मी त्याला सांगितले की या सर्व गोष्टी लग्नानंतर करूया. त्यानंतर त्याने मला आणि माझ्या बहिणीला खोलीत कोंडून ठेवले. त्याने माझ्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर 2024 मध्ये महेंद्रने लग्न मोडले.
आम्ही याला विरोध केला असता त्याने मला, माझ्या बहिणीला आणि भावाला खोट्या खटल्यात अडकवून तुरुंगात पाठवले. यात महेंद्रचा मित्र सीआय पवन चौबे यानेही त्याला साथ दिली. आता मोठ्या कष्टाने आम्हाला जामीन मिळाला आहे. म्हणूनच महेंद्रला त्याच्या कृत्याची शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे, असेही तिने सांगितले.


