मुंबई : बदलापूरमध्ये एकाहून एक भयानक गुन्ह्यांच्या घटना उघडकीस येत आहेत. कॅन्सरच्या उपचारांसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर एका 27 वर्षांच्या तरूणाचे अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. बिहारमधून उपचारांसाठी आलेल्या मुलीला भाड्याने घर घेऊन देणाऱ्या , आधार देण्याचं नाटक करणाऱ्या नराधमानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आला असून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. लोकांमधील माणुसकी, सदसदविवेकबुद्धी नावाचा प्रकार संपुष्यात आला की काय अशी शंका आता प्रत्येकाच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. हे सगळं कमी की काय म्हणून याच बदलापूरमधून आणखी एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे.
कलिंगड विकणारा, साधासुधा दिसणाऱाय मनुष्य,याच कलिंगड विक्रीच्या आडून भयानक कृत्य करत होता. चक्क नवजात बाळांच्या विक्रीचा गोरखधंदा करत असल्याचे समोर आले असून बदलापूरमध्ये फॉरेस्ट विभागाने या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार साळवे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
कचरा टाकण्यावरून वाद, आणि उघड झालं भयानक सत्य –
बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील संबंधित इसम हा फॉरेस्ट विभागाच्या जागेवरती फळविक्रीचा कचरा टाकत होता. त्यावरूनच झालेल्या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या अनुषंगाने शहानिशा करण्यासाठी त्या फळविक्रेत्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आलं. त्या तपासादरम्यान त्याचा मोबाईलही चेक करण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
आरोपीच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपवर काही नवजात बालकांचे फोटो आणि विक्री दर आढळले आणि पोलीसही हादरले. तसेच बालकांच्या विक्रीसाठी पाच ते सात लाख रुपयांपर्यंत किंमतींचा उल्लेखही त्याच्या मोबाईलमधील चॅटमध्ये सापडले.
हा एक सराईत आरोपी असून यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती अशी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसाची पोलिस कोठडीत सुनावली. वन अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या सतर्कतेमुळे बालकांची तस्करी उघडकीस आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे.
ADVT –




