संजय पिळणकर.
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून वेंगुर्ला शाळा नंबर १ या शाळेचे अग्रक्रमाने नाव घेतले जाते. या प्रशालेत एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून शालेय विद्यार्थ्यांचा आठवडी बाजाराचे नियोजन सोमवार, दि.०७ एप्रिल २०२५ रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा, वेंगुर्ले नं १ येथे सकाळी ८.३० ते ११.१५ या वेळेत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक – पालक संघ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
संदर्भीय विषयास अनुसरुन आज शनिवार दि ५ एप्रिल रोजी पालक सभा घेण्यात आली.यावेळी सोमवार दि. ७ एप्रिल रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या आठवडी बाजाराचे नियोजन करण्यात आले.
तरी प्रशालेच्या सर्व पालकांनी, माजी विद्यार्थ्यांनी,शिक्षण प्रेमी, स्थानिकांनी,शहरातील विविध संस्थांनी आपल्या मित्रमंडळींसह आठवडा बाजाराला उपस्थित राहून विविध प्रकारच्या मालाची विद्यार्थ्याकडून खरेदी करावी व शालेय विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून खरेदी विक्रीचे ज्ञान मुलांना प्राप्त होईल असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.


