अकोला : अकोल्यात ऐका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. रात्री 2 वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर या तरुणाने अत्याचार केला आहे. अत्याचार करून आरोपीने अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं. ही घटना समोर येताच सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजता दोघी अल्पवयीन मैत्रिणी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. याचवेळी एका 25 वर्षीय तरुणानं एका मुलीला दुचाकीवर सोबत नेत अकोट फैल भागात तिच्यावर अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे.



