संतापजनक.! – २५ वर्षीय नराधमाने तोडले १५ वर्षीय बालिकेचे लचके.!

अकोला : अकोल्यात ऐका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. रात्री 2 वाजताच्या सुमारास अकोला रेल्वे स्टेशन चौकातून या मुलीला सोबत नेत तिच्यावर या तरुणाने अत्याचार केला आहे. अत्याचार करून आरोपीने अल्पवयीन मुलीला पुन्हा रेल्वे स्टेशन चौकात आणून सोडलं. ही घटना समोर येताच सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री दोन वाजता दोघी अल्पवयीन मैत्रिणी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या होत्या. याचवेळी एका 25 वर्षीय तरुणानं एका मुलीला दुचाकीवर सोबत नेत अकोट फैल भागात तिच्यावर अत्याचार केला. पीडित अल्पवयीन मुलगी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी आहे.

ही अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीकडे आली होती. रात्री दोन वाजता अकोला रेल्वे स्थानक चौकातून पीडितीला दुचाकीने सोबत नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला

तर अत्याचार करणाऱ्या तरुणाची ओळख समोर आली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, या घटनेने अकोला जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles