Sunday, June 22, 2025

Buy now

spot_img

‘पाटील’ केवळ नाव नव्हे ‘माणुसकीचे सर्वोच्च परिमाण.!’ ; PSI प्रमोद पाटील खाकी वर्दीतला दर्दी माणूस, आपल्या वागणुकीने खाकीला पुन्हा दिला आदर्श ‘आयाम.!’.

सावंतवाडी : मळगावहून सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वार महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मळगाव घाटीत गाडी घसरून अपघात झाला. या अपघातात सदर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याच दरम्यान या मार्गावरून जाणारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी अपघातग्रस्त महिलेला पाहताक्षणी आपली गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी सदर महिलेला धीर देत उपचारासाठी आपल्या गाडीत बसवून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान,
पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या या कृतीतून खाकी वर्दीतील माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली. यापूर्वी त्यांनी निवडणुकीच्या काळात देखील वृद्ध व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी खाकी वर्दीतल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles